पनवेल येथे तरुणाचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहर |

कॉलमच्या क्लिप कॉलममधून निघाल्याने कॉलम अंगावर पडला आणि बांधकामाच्या सळ्या पोटात घुसल्याने मृत्यू झाल्या प्रकरणी क्रेन ऑपरेटर विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तळोजा येथे बांधकामाच्या भिंतीचे कॉलम क्रेन द्वारे बसवण्याचे काम चालू असताना क्रेनचा हुकमध्ये असलेला सिमेंटचा वजनदार कॉलम क्रेनचा हुक तुटल्यामुळे वरून मनोज सोरान याच्या अंगावर पडला व खाली असलेल्या बांधकामाच्या सळ्या त्याच्या पोटात व शरीरात इतरत्र ठिकाणी घुसल्या तसेच बांधकामाचा कॉलम त्याच्या डाव्या पायावर पडून पाय मांडी पासून तुटून वेगळा झाला. त्याला शिर्के कंपनीच्या रुग्णवाहिकेने मेडिकल हॉस्पिटल खारघर येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार सदरचा अपघात होण्यास व मनोज सोरान यांच्या मरण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी क्रेनचालक हैदरअली खजले इमाम शेख (24 राहणार शिर्के लेबर कॅम्प, तळोजा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Exit mobile version