श्रीवर्धन-कारिवणे येथील धबधब्याच्या डोहात तरुणाचा मृत्यू

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे येथील धबधब्याचा आनंद लुटण्यास गेलेल्या तरुणाचा मंगळवारी (दि.17) खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील शेवटच्या टोकाला दुर्गम भागात असलेल्या कारिवणे येथील गावाशेजारील निर्सगाच्या सानिध्यात असलेल्या नदीवरील धबधब्याचा आनंद लुटणे वाळवटी येथील तरुणाच्या जीवावर बेतले आहे. अनिस कैसर राऊत (18) असे तरूणाचे नाव आहे. तीन मित्रांसोबत अनिस हा धबधब्यावर मंगळवारी (दि.17) दुपारच्या वेळेस पोहायला गेला होता. धबधब्याच्या प्रवाहाच्या खाली असलेल्या खोल डोहात अनिसने उडी मारली असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. त्यावेळी आरडा ओरड केल्यानंतर गावातील तरुण व त्याच्या मित्रांनी त्याला मृत अवस्थेत बाहेर काढले. शवविच्छेदनाकरीता अनिस राऊत याचा मृतदेह श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

Exit mobile version