डोहात बुडून तरुणांचा मृत्यू

। नेरळ । वार्ताहर ।
आजचा धुळवडचा सण साजरा करून पोहण्यासाठी उल्हास नदीवर गेलेले दोन तरुण सांगवी येथील डोहात बुडाले. मात्र, त्यातील एकास जिवंत काढण्यात यश आले असून, एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन तासांनी कर्जत पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्त टीमच्या माध्यमातून तरुणाचा मृतदेह नदीच्या खोल पाण्यातून शोधून बाहेर काढला.
सांगावी-खांडपे येथील उल्हास नदीच्या डोहामध्ये दुपारी एक वाजता पोहचले होते. त्यावेळी त्या 10 जणांच्या ग्रुप मधील दोन तरुण खोल पाण्यात बुडाले. हॉटेल रेडिसन ब्लुच्या बाजूला असलेल्या त्या डोहाच्या बाजूला अनेक गावातील तरुणांना करण धर्मसिंह आणि अक्षय विनोद डोडीया हे दोघे बुडाले असल्याचे लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य तरुणांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर स्थानिकांनी त्यातील करण धर्मसिंह यास खोल पाण्यातून बाहेर काढले आणि कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी पाठवले.
कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना माहिती मिळताच, त्यांनी खोपोली येथील अपघातग्रस्त यांच्या टीमला पाचारण केले. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना अपघातग्रस्थांच्या टीमला पाठवण्याची सूचना केल्यानंतर दुपारी अडीच वाजता खोपोली येथील बुडालेल्या तरुणाचं शोध साजरा करण्यासाठी टीम सांगवी येथे पोहचली. तेथे अपघातग्रस्तांच्या टीमचे दर्श अभानी, विजय भोसले, हनीफ कर्जिकर, कार्तिक गोयल, जयंत तांबे, पूजा चांदूरकर-साठेलकर, भक्ती साठेलकर, अरुण म्हापणकर, वीणा पाटील, अक्षय चांदूरकर, यश गोयल, विवेक रावळ, विशाल चव्हाण, विशाल पवार, अश्रफ शेख आणि,गुरुनाथ साठेलकर यांनी तीन तासांनी उल्हास नदीच्या डोहातून अक्षय विनोद डोडीया या 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

Exit mobile version