। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील उंदेरी वाजेवाडी गावाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिवा रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने मुत्यू झाला आहे.
रेल्वेतून पडून बऱ्याच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असतात. अशीच एक दुर्दैवी घटना महाडजवळ घडली आहे. खेड येथील संकेत पांडुरंग गोठल (20) हा तरुण दिवा रत्नागिरी पॅसेंजर रेल्वेच्या दारात उभे राहून दादर ते खेड असा प्रवास करत होता. अचानक तोल गेल्याने तो महाड तालुक्यातील उंदेरी वाजेवाडी गावाजवळ रेल्वेमधून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पोलीस हवालदार मनीष भोईर व पोलीस हवालदार दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.