दहीबाव येथील युवक बेपत्ता

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
देवगड- दहीबाव येथील 27 वर्षीय युवक अक्षय चंद्रकांत बावकर हा मुंबईला जातो असे सांगून घरातून निघून गेला असून, तो अद्याप परतलेला नसल्याची फिर्याद चंद्रकांत विठ्ठल बावकर (66) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. देवगड पोलीस स्थानकात तो नापत्ता झाल्याची नोंद करण्यात येऊन अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत. तरी याप्रकरणी कुणालाही कोणतीही माहिती असल्यास किंवा मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version