। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी आदीवासीवाडीमधील 27 वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
आदिनाथ साईनाथ नाईक असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण 14 फेब्रुवारी सायंकाळी मित्रांसोबत जंगलात जातो, असे सांगून गेला. एक ते दोन दिवस उलटूनही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो काही सापडला नाही. अखेर मांडवा सागरी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. आदिनाथ नाईक याची उंची पाच फुट, मध्यम बांधा, चेहरा गोल, अंगात टि-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट, घातलेले असे वर्णन आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोय यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास महिला पोलीस हवालदार ए. व्ही. करावडे करीत आहेत.