पळस्पे येथील तरूण बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

पळस्पे फाटा येथील फहाद मस्तानअली शेख (14) हा राहत्या घरातून कोणास काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. फहाद रंगाने सावळा, उंची 5 फुट 5 इंच, अंगाने मध्यम बांधा, चेहरा उभट, केस काळे वाढलेले, कपाळाच्या वर डाव्या बाजूस जखमेचे व्रण असून अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट आहे. या तरुणाबाबत अधिक माहिती असल्यास पोलीस ठाणे 27452333 किंवा सपोनि राजरत्न खैरणार यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version