| वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील तांबाटी येथील गोदरेज कंपनीत काम करणारा एक तरुण अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनिल बुध्या लेंडे (27, रा. घोटे, ता. पेण, जि. रायगड) हा 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता कंपनीतून कोणालाही न सांगता निघून गेला आणि त्यानंतर त्याचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. 11 दिवस उलटूनही तो घरी परत आलेला नाही. त्यामुळे सुनिलचा मोठा भाऊ कमलाकर बुध्या लेंडे याने खालापूर पोलीस ठाण्यात सुनील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
खालापूर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आणि त्यांची टीम सुनिलचा शोध घेत असून जर कोणाला सुनिलबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी त्वरित खालापूर पोलीस ठाण्याशी (02192-275033) किंवा तपासी अंमलदार आर. डी. उघडा (मो. 8805395090) यांच्याशी संपर्क साधावा, असे नागरिकांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.