| पनवेल | वार्ताहर |
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. याच वेळी शेजारुन भारत गॅस कंपनीचा ट्रक या तरुणाच्या हातावरून गेल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. प्रणव ठाकूर (33) असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणव ठाकूर हा रोडपाली येथे राहत असून, रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सीईटीपी प्लांट तळोजा एमआयडीसी येथे तो त्याच्या दुचाकीने जात होता. पाऊस पडत असल्याने तो हळूहळू दुचाकी चालवत होता. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचा त्याला अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी खड्ड्यात घसरुन तो खाली पडला. या वेळी वेगाने आलेल्या भारत गॅस ट्रकचे चाक त्यांच्या उजव्या हातावरून गेले आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर ट्रक चालक पळून गेला. या प्रकरणी प्रणव याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरू केला आहे.
ट्रक हातावरून गेल्याने तरुण जखमी
