चाकूच्या हल्ल्याने तरुणाची हत्या

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईतील सायन कोळीवाडा येथे तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

सायन कोळीवाड्यातील महाराष्ट्र नगर परिसरात रात्री 12.30 च्या सुमारास काही लोक आवाज करत मोठा गोंधळ करत होते. त्यामुळे विवेक गुप्ता (22) याचा त्या लोकांबरोबर वाद झाला. काही वेळातच हा वाद टोकाला पोहोचला. त्यानंतर काहींनी विवेकवर चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Exit mobile version