| पनवेल | प्रतिनिधी |
करंजाडे येथील राहत्या घरातून एक तरुण कोणास काही एक न सांगता निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रणित प्रदिप शिंदे (25), असे त्याचे नाव असून त्याची उंची 8 इंच अंदाजे, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहरा-गोल, केस-काळे जाड वाढलेले नाक मोठे बसके, अंगात नेसुन गुलाबी रंगाचा टी शर्ट, मिलीटरी रंगाची पॅन्ट, सोबत मोबाईल नेलेला नाही तसेच भाषा मराठी, हिंदी भाषा बोलता येथे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई संपर्क क्र.8655354111 वर किंवा तपासी अमंलदार एस.आर. जाधव मोबा नं. 8097178066 किंवा प्रदिप शिंदे, मोबा नं. 8668481668 वर संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आला आहे.







