। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात एक तरुण राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता वास्त्यव्यास आला असून, त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत. सदर तरुणाचे नाव आकाश तानाजी सोमवंशी (27), मूळ राहणार लातूर, सध्या राहणार नानोसे, श्रीमद राजचंद्र आत्मा तत्व रिसर्च सेंटर, ता. सुधागड, जि. रायगड असे असून मौजे नानोसे येथून मुळगावी बेळसांगवी, जिल्हा लातूर, येथे जातो असे सांगून कुठेतरी निघून गेला तो आजपर्यंत मिळून आला नसल्याने पाली पोलीस स्टेशन येथे तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पनवेल परिसरात उतरल्याचे दिसून येत आहे. तरी त्याचेबाबत कोणाला काही एक माहिती मिळून आल्यास तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे, पाली पोलीस ठाणे संपर्क क्र. पाली पो. ठाणे नंबर. 02142-242223, भरत शिवाजी सोमवंशी, (नातेवाईक) मो. नं. 9322523887 येथे कळवावे असे आवाहन त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे.
सुधागड येथील तरुण बेपत्ता
