कुरुक्षेत्रात महाराष्ट्राचा सुवर्णइतिहास!
| हरियाणा | वृत्तसंस्था |
कुरुक्षेत्र येथे सुरू झालेल्या 35 व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद पटकावत सलग आठव्या अजिंक्यपदाची ऐतिहासिक नोंद केली. या स्पर्धेत इला पुरस्कार महाराष्ट्रच्या अपर्णा वर्देने, तर भरत पुरस्कार ओडिसाच्या सत्या राजन बेहरने पटकावला. सलग नऊ वेळा अजिंक्यपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या किशोर संघाला यंदा मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने राजस्थानवर एक डाव व 12 गुणांनी विजय मिळवला. पहिल्याच आक्रमणात महाराष्ट्राने 17 गुणांची निर्णायक आघाडी घेतल्याने सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. महाराष्ट्राकडून राही पाटील, वेदिका तामखेडे, अपर्णा वर्दे, ऋतुजा सुरवसे, पियुशा परमाळकर यांनी कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब के







