| कोलाड | वार्ताहर |
शेकाप हा शेतकरी, श्रमजीवी, कष्टकरी व कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सदैव लढा व प्रश्न सोडवून देणारा पक्ष आहे. त्यामुळे येथील शेतकरी व कष्टकरी वर्ग हा कायम शेकापच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली तसेच नेतृत्वाखाली पक्षवाढीवर भर दिला पाहिजे, असे वक्तव्य शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी केले आहे. रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पुरोगामी युवक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा रोहा येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी कामगार पक्षाच्या रोहा तालुका पुरोगामी युवक संघटनेच्यावतीने पदाधिकाऱ्यांची बैठक पक्ष्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पार पडली. बैठकीदरम्यान शंकरराव म्हसकर यांनी सांगितले की, युवकांसाठी पक्षाची बांधिलकी, त्याचबरोबर गावागावात पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या विचारसरणीशी जुळवून पक्ष वाढीवर भर दिला पाहिजे. तसेच, तळागालातील नागरिकांच्या समस्या त्यांच्या सर्वांगिक विकासाला चालना दिली पाहिजे. शेकाप हा शेतकरी, श्रमजीवी, कष्टकरी, कामगार यांच्या न्याय हक्कांसाठी सदैव लढा व प्रश्न सोडवून देणारा पक्ष आहे. त्यामुळे येथील शेतकरी कष्टकरी वर्ग हा कायम शेकापच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील व प्रवक्त्या तथा महाराष्ट्र मिडीया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा चिटणीस सुरेश खैरे व महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीवर भर दिला पाहिजे. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुक जिंकायच्या आहेत. अशा प्रकारे युकांच्या विविध समस्यांयावर म्हसकर यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
यावेळी नवनिर्वाचित तालुका चिटणीस शिवराम महाबले, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य मारुती खांडेकर, विठ्ठल मोरे, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष रवींद्र झावरे, अमोल शिंगरे, सदस्य पोश्या कांबळे, महादेव शाब्बासकर, मंगेश खरीवले, शिरीष महाबले, अरुण चौगले, महेन्द्र पार्टे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.






