अलिबागमध्ये तरुणाईचा एल्गार

|अलिबाग |प्रतिनिधी|

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पीएनपी नाट्यगृह येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली.

युवकांना पाठिंबा करण्यासाठी आणि झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व युवक, कार्यकर्ते व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित दाखवली. 

दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर  झालेल्या लाठीचार्जचा, तसेच आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नांचा आणि तरुणांवर झालेल्या कारवाईचा भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, गौतम पाटील, सुरेश घरत, अनिल पाटील, परेश देशमुख तसेच पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version