| खरोशी | प्रतिनिधी |
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या दिक्षांत समारंभात युवराज सदानंद पाटील हा संगीत विशारद-पखवाज ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. गेली 10 वर्षे तो पखवाजचे शिक्षण घेत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गुरुवर्य कै. शंकरबुवा मेस्त्री यांच्याकडे झाले नंतर स्वरांजली क्लास पेण येथे गुरुवर्य मोकल व एन. ए. पाटील यांच्याकडे झाले. त्याच्या या यशाबद्दल श्री त्र्यंबकेश्वर प्रासादिक भजन मंडळी व ग्रामस्थ मंडळी शिरवली यांच्याकडून कौतुक होत आहे. त्याचे आजोबा कै . हिराजी मास्तर हे सुद्धा मृदुंगमणी म्हणून संतश्रेष्ठ श्री पेडणेकर महाराज आश्रम, सासवने येथे मधुभक्त म्हणून सेवेकरी होते . त्याला मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.