| अलिबाग | वार्ताहर |
तिसऱ्या सामन्यात युवराज इलेव्हन थळ संघाचे खेळाडू सन्मित्र म्हात्रे व नागेश शिद हे खेळत असून नागेश शिदने पहील्याच ओव्हरमध्ये १ षटकार १ चौकार मारत उत्तम अशी खेळी करत सामन्याची चुरशीची सुरूवात केली आहे.
नागेश शिदने १ षटकार १ चौकार मारत केलेल्या उत्तम अशी खेळीनंतर पाठोपाठ खंड पडू न देता सन्मित्र म्हात्रेने दुसऱ्याच ओव्हरमध्ये षटकार मारले आहेत.
नागेश शिदच्या खेळीत सातत्य तिसऱ्या षटकात २ षटकार
युवराज इलेव्हन थळ संघाचे खेळाडू सन्मित्र म्हात्रे व नागेश शिद हे तिसऱ्या षटकातही बिनबाद खेळत असून तिसऱ्या षटकातही नागेश शिदने पहील्या षटकाच्या खेळीचे सातत्य राखून पुन्हा एकदा २ षटकार मारून दाखवली आहे.
सन्मित्र म्हात्रे ‘बॅक टू दि पॅव्हेलियन’
युवराज इलेव्हन थळ संघाचे खेळाडू सन्मित्र म्हात्रे हे अतिशय उत्तम अशी खळ करत असतानाच दर्शन कडवे या आध्या सप्लायर्स म्हात्रोळी संघाच्या फलंदाजाने सन्मित्र म्हात्रे ‘बॅक टू दि पॅव्हेलियन’ करीत बाद केले.