युझवेंद्र चहल खेळणार काऊंटी

| मुंबई | प्रतिनिधी |

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपच्या बरोबर 1 महिन्याआधी बीसीसीआय निवड समितीने 5 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा केली. आशिया कप 2023 च्या टीममधूनच वर्ल्ड कपसाठी एकूण 15 खेळाडूंची निवड करण्यात आली. यातून युझवेंद्र चहल यांचा विचार केला नाही. यूझवेंद्र चहलने वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहल केंट टीमकडून काऊंटी क्रिकेट खेळू शकतो. चहलचं या निमित्ताने काऊंटी डेब्यू होऊ शकतं. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. चहलला बीसीसीआयकडून काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.

Exit mobile version