जि.प.,पं.स. निवडणुकीसाठी गट, गण प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना

। अलिबाग । जिमाका ।
मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2022 साठी निवडणूक विभाग व निर्वाचक गण बाबत प्रभाग रचना प्रस्ताव तयार करून प्रसिध्दी देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदरची अधिसूचना रायगड जिल्हा परिषद, तालुक्यातील सर्व पंचायत समित्यां तसेच जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयांचे नोटीस बोर्डावर दिनांक 02/06/2022 रोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version