उसाळे कबड्डी स्पर्धेत झाप संघ विजयी

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी ।

सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय भवानी मित्र मंडळ उसाळे यांच्या वंतीने तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन शनिवार (दि.14) करण्यात आले होते.

या स्पर्धेत तालुक्यातील 24 संघाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत झाप विरुद्ध चिवे या संघात झाली. दोन्ही संघातील खेळाडूंनी आपला अंतिम विजय मिळवण्यासाठी बहारदार खेळ केला. मात्र या स्पर्धेतील अंतिम विजयी संघ श्री नाथभैरव झाप या संघास रोख रक्कम 11 हजार 111 रु व आकर्षक चषक, तर उपविजेता स्वयंभू हनुमान चिवे संघास रोख रक्कम 7 हजार 777 रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक रंधुर्नधर पाली संघास रोख रक्कम 5 हजार 555 रु व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमाक ओम काळभैरव आपटवणे संघास रोख रक्कम 5 हजार 555 रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यश सितापराव (झाप), उत्कृष्ट चढाईदार स्वप्नील भिलारे (चिवे), उत्कृष्ट पक्कड शिरीष कदम (आपटवणे), पब्लिक हिरो प्रणय सपकाळ (पाली) या खेळाडूंना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version