राज्य कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा
। खांब । प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय सेशिंकाई युनियनची मान्यता असलेल्या रोह्यातील झेन मार्शल आर्ट्स स्कूलच्या 22 विद्यार्थ्यांनी चेंबूर, मुंबई येथील ग्रीन एकर्स अकादमी येथे झालेल्या महाराष्ट्र गोजू-र्यू राज्य निवड कराटे चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी एकूण 44 पदके जिंकली. त्यात 9 सुवर्ण, 5 रौप्य, व 30 कांस्य पदकांचा समावेश आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा महाराष्ट्र गोजू-र्यू कराटे-डो असोसिएशनने आयोजित केली होती, जी यूजीकेएफ, एजीकेएफ आणि डब्लूजीकेएफची सदस्य आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीला नियमित घेण्यात येणारी इंटर-डोजो चॅम्पियनशिप आणि निलेश मनोहर यांनी आयोजित केलेल्या विशेष प्रशिक्षण सत्रांचे पाठबळ मिळाले. झेन मार्शल आर्टस् स्कूल इंडियाची स्थापना 2008 मध्ये क्योशी निलेश मनोहर – 7 वा डॅन ब्लॅक बेल्ट यांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच झेन मार्शल आर्टस् स्कुलचे प्रशिक्षक ईशा लाड, प्रमोद भगत आणि आयुष मोरे यांच्या प्रयत्नांचे विषेश कौतुक होत आहे.
