लातूरच्या सांगवी सुनेगाव या गावात शून्य टक्के मतदान

| लातूर | वृत्तसंस्था |

लातूर जिल्ह्यातील सांगवी सुनेगाव या गावात आतापर्यंत एकाही नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागणी पूर्ण न झाल्याने गावकर्‍यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी आता पर्यंत या मतदानकेंद्रावर शून्य टक्के मतदान झाले आहे. लातूर नांदेड हायवे वर कट पॉईंट देण्यात यावा या मागणीसाठी गावातील गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारले आहे. सांगवी सुनेगाव येथील ग्रामस्थांची मागील अनेक दिवसापासून हायवेला कट पॉईंट मिळण्याची मागणी होती. मात्र प्रशासन काही केल्या ती पूर्ण करत नसल्याने संतप्त गावकर्‍यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या मतदानकेंद्रांवर गावातील एकही नागरिक या मतदान केंद्रांवर फिरकला नाहीये. या गावात 477 मतदार असून या सर्व मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

Exit mobile version