धुतूम ग्रामपंचायतीमध्ये शुन्य घनकचरा प्रकल्प


। जेएनपीटी । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धुतूम ग्रामपंयातीने पर्यावरणास पूरक अशा शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केला आहे.

आयोटीएल कंपनीच्या सीएसआर फंडातून या प्रकल्पासाठी 26 लाख 85 हजार रूपये खर्च करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कोव्हिडमुळे उरण दौर्‍यावर असताना सदर प्रकल्पाला भेट देऊन नवीन प्रोजेक्टचे उद्घाटन केले. या अगोदर ग्रामपंचायत धुतूम यांनी हा प्रकल्प पायाभूत सुविधा व ओल्या काचर्‍यापासून कंपोस्ट खत असा प्रोजेक्ट कार्यान्वित होता. याच्यात संपूर्ण कचर्‍याची विल्हेवाट लागत नसल्याने सरपंच रेश्मा ठाकूर यांनी एलओटीएल यांच्याकडे पाठपुरावा करून सीएसआरच्या माध्यमातून हा संपूर्ण शून्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उरण पंचायत समितीचे सदस्य दिपक ठाकूर, आयओटीएलचे व्हाइस प्रेसिडेंट अतुल खराटे, मिलिंद मोघे कन्सल्टंट, भूपेश शर्मा टर्मिनल मॅनेजर, दुर्गाप्रसाद त्रिपाठी सेफ्टी हेड, उरण तालुक्याचे गटविकास अधिकारी नीलम गाडे, विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच सविता ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली पाटील, माजी उपसरपंच आशा ठाकूर, माजी उपसरपंच सदानंद ठाकूर, तुकाराम ठाकूर, मेघनाथ ठाकूर, नंदेश ठाकूर, किशोर परब आदी मान्यवर उपस्थित होती.

Exit mobile version