जि.प. अध्यक्षांचा लाचखोर स्वीय सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

तब्बल दीड लाखांची लाच स्वीकारल्याची माहिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्विय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे या लाचखोर अधिकाऱ्याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली. बुधवारी (दि. 23) सायंकाळी 4.30 च्या सुमारास लाच घेताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. भस्मे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक या पदावर कार्यरत असून साधारणपणे दीड लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याची चर्चा आहे. या कारवाईनंतर रायगड जिल्हा परिषदेतील पारदर्शक कामाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारदार यांच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची मागणी करून ती लाच स्वीकारल्याची माहिती समोर आलीये. या सगळ्या प्रकारांनंतर आता रायगड जिल्हा परिषदेच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Exit mobile version