राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी चौघांची निवड
| अलिबाग | वार्ताहर |
कर्जतमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेतून रायगड जिल्ह्याच्या संघात अलिबागमधील चौघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कर्जत येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अलिबागमधील अरुण गुरव (अलिबाग), जय कवळे (नवगाव), आजाद अंसारी (वायशेत), अमित बोला (जीत नगर) यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच या चारही खेळाडूंची अहमदनगर येथे होणार्या राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रायगड जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा संघाचे प्रशिक्षक संतोष कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चारही खेळाडू अहमदनगर येथे रवाना झाले आहेत.