। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून लडाख व सिक्कीम सीमेवर चीनकडून मोठया प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न झाल्यानंतर आणि त्यातून उडालेल्या चकमकींमध्ये आपल्याकडे लष्करी अधिकारी आणि काही जवानांचे प्राण गेले. संघर्षानंतर चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. या संघर्षानंतर भारतीय नागरिकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. त्यानंतर चीनला धडा शिकवण्याच्याफ ऊर्मीतून अनेक भारतीयांनी चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आल्या नंतर नागरिकांनी चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम म्हणून एका वर्षात 43 टक्के भारतीयांनी कोणतीही चिनी वस्तू खरेदी केलेली नाह अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.