अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रामराजमधील एक हरहुन्नरी कार्यकर्ते नासिर गनी बेबन यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत आज शेकापक्षात प्रवेश केला. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून शेकापक्षात स्वागत केले. शेतकरी कामगार पक्ष हाच काम करणारा पक्ष आहे हा विश्वास असल्याने आणि लोकांना खरी गरज असताना शेतकरी कामगार पक्ष आणि कार्यकर्ते कायम जनतेच्या पाठीशी उभे राहतात ह्या विचाराने प्रभावित होऊन याच कार्यप्रणालीत सहभागी होण्यासाठी प्रवेश घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख आणि नेत्या चित्रलेखा ताई पाटील यांच्या हस्ते नासिर बेबन यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी,माजी पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे,नितीन पालकर,नौशाद मुजावर,प्रवीण धाटावकर,गिरीश तेलगे,विक्रांत वार्डे,संतोष झावरे,चंद्रकांत बामणे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.