। रोहा । प्रतिनिधी ।
शेकापच्या महिला आघाडीच्या नेत्या व अलिबाग नप नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने रोहा तालुक्यातील भातसई येथे कोरोना लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
या लसीकरण मोहिमेला भातसई पंचक्रोशीतील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या प्रसंगी रोहा पंस सभापती गुलाब वाघमारे, आरडीसीसी बँक संचालक गणेश मढवी, भातसई सरपंच गणेश खरीवले, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष जीवन देशमुख, तालुका महिला आघाडी अध्यक्ष विनया चौलकर, खारगाव पंस चिटणीस हरेश म्हात्रे, हेमंत ठाकूर, रत्नदीप चावरेकर, दिलीप म्हात्रे, सुरेश कोतवाल, नेहा खरीवले, राम गिजे आदी मान्यवर उपस्थित होते. भातसई येथे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पाचशे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.







