। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोपनहेगच्या पार्केन स्टेडियमवर यूरो कप 2020 स्पर्धेतील क्रोएशिया विरुद्ध स्पेन संघात चित्तथरारक सामना रंगला. 121 मिनिटांपर्यंत सुरू असलेल्या या लढतीत स्पेनने क्रोएशियाला 5-3 अशी मात दिली. 80व्या मिनिटापर्यंत 1-3 ने पिछाडीवर असेलेल्या क्रोएशियाने उरलेल्या वेळेत दोन गोल करत बरोबरी साधली. त्यामुळे सामन्यात 30 मिनिटांचा कालावधी वाढवण्यात आला. या अतिरिक्त वेळेत स्पेनने अजून दोन गोल मारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश नोंदवला.
मारिओ पासिलिचने क्रोएशियासाठी तिसरा गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. सामना 3-3 असा बरोबरीत असल्यामुळे सामन्यात 30 मिनिटांचा कालावधी वाढवण्यात आला. अतिरिक्त वेळेतील 100व्या मिनिटाला अल्वारो मोराटोने स्पेनसाठी चौथा गोल केला. त्यानंतर तीन मिनिटांनी मिकेल ओयाझबालने स्पेनसाठी अजून एक गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पेनचा पुढील सामना फ्रान्स किंवा स्वित्झर्लंडशी होईल.