नऊ ग्रामीण नळपाणी योजनांना मंजुरी
जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडून मंजुरी
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ नवीन नळपाणी योजनांना रायगड जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नवीन नळपाणी योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, सव्वा सहा कोटी रुपयांची नळपाणी योजनांमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
जलजीवन मिशन मधून 2021 मध्ये आसल ग्रामपंचायत मधील मौजे भूतीवली येथील नळ पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी एक कोटी 17 लाख निधी मंजूर झाला आहे.मौजे कळंब येथील नळ पाणी योजना करण्यासाठी एक कोटी 90 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.अँभेरपाडा येथील नळपाणी योजनेसाठी 70.68 लाखाचा निधी मंजूर असून ओलमण येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी 68 लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना बनविण्यात आली आहे.बीड तर्फे बुद्रुक ग्रामपंचायत मधील नेवाळी तर्फे वासरे या नळपाणी योजनेसाठी 37.74 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.तर पळसदरी नळपाणी योजनेसाठी 52 लाख तर त्याच ग्रामपंचायत मधील वरणे नळपाणी योजनेसाठी 42 लाख आणि कोंदिवडे नळपाणी योजनेसाठी 25 लाख इतका निधी मंजूर आहे.
ओलमण साठी अनेक योजना करण्यात येत आहेत, मात्र उंचावर असल्याने पाणीपुरवठा योजना अल्पावधीत नादुरुस्त होतात.त्यामुळे या भागात शासनाने किंवा जिल्हा परिषदेने पाणी साठवण तलाव मंजूर केल्यास त्यासाठी लागणारी जमीन माझे कुटुंब विनामोबदला देण्याचे जाहीर करीत आहे.
दादा पादिर, माजी सरपंच,ओलमण
ग्रामीण भागातील नळपाणी योजना तयार करून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न आहे.नजीकच्या काळात आणखी नळपाणी योजनांना मंजुरी देण्याचा प्रयत्न आहे.
सुधाकर घारे, उपाध्यक्ष, राजिप