तिसर्‍या लाटेसाठी सरकारची काय तयारी : सैफ सुर्वे

रत्नागिरी

। चिपळूण । प्रतिनिधी ।

कोविड-19 वाढता प्रभाव बघून सध्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे यांनी संस्थापक राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री पर्यंत पत्र पाठवले आहे. 

राज्यात दररोज रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे व दररोज मृत्यू ही होत आहेत. यात अनेक लोकांना चांगली सुविधा न मिळण्याचा सुद्धा आदळून येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य यंत्राने कशी वडवता येतील, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमदेसिविर याची जास्त जास्त कशी उपलब्ध होतील. लोकांमध्ये जनजागृती कशी निर्माण होईल व बरेच काही जिल्हा स्तरावर एक जिल्हाधिकारी म्हणून करू शकतो अशे मुद्दे मांडले आहेत. त्यात पोलिस यांच्यासाठी काही खास मागणी आहेत. प्रत्येक तालुक्यात पोलिसांसाठी कमीत कमी 15 बेड सर्व सोयीसह राखीव ठेवावेत व प्रत्येक सरकारी कोविड सेंटर च्या बाहेर एक रुग्णवाहिका पोलिसांसाठी असणे गरजेचे आहे. असे सैफ सुर्वे यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.

रात्रंदिवस पोलिस रस्त्यावर उतरून आपला कर्तव्य निभावत आहेत. त्याच बरोबर सैफ सुर्वे यांनी सरकार ला काही ठोस प्रश्‍न विचारले आहेत. गेल्यावर्षी एवढी वाईट परिस्थिती बघून सुद्धा यावर्षी  चांगली सुविधा लोकांना मिळालेली नाहीत. आणि येणार्‍या काही महिन्यात असं म्हणतात की तिसरी लाट येणार आहे जे छोट्या मुलांसाठी प्राणघातक आहे. त्यात सैफ सुर्वे म्हणाले की मला फक्त सरकारला एवढाच विचारायचं आहे की आपली सरकार यासाठी किती तय्यार आहे? यासाठी कुठली व्हाक्सीन तयार  होत आहे का छोट्या मुलांसाठी? छोट्या मुलांच्या सुरक्षेसाठी कुठला प्लॅन इ तय्यार आहे का? त्यावेळी ऑक्सिजन आणि बेड च्या समस्या सरकार सोडवू शकते का? अशे प्रश्‍न महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैफ सुर्वे यांनी विचारले आहेत.

Exit mobile version