People return to their house, completely destroyed by Cyclone Yasa, northern Bua, Vanua Levu, Fiji, December 19, 2020, in this photo supplied by IFRC. Ponipate/IFRC/via REUTERS
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणार्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल 120 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणार्या वार्यांनिशी हे चक्रीवादळ धडकलं. त्यामुळे किनारी भागात असणार्या घरांचं आणि नागरी सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत.
यास चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत समुद्रात असणारं हे चक्रीवादळ आता पूर्णपणे जमिनीवर आलं आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
या महिन्यात 21 मे पासूनच बंगालच्या उपसागरात अंदमान-निकोबार बेटांच्या उत्तरेकडे चक्रीवादळासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं होतं. 24 मे रोजी वार्याचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला. मंगळवारी वेगाने वाहणार्या वार्यांचं चक्रीवादळात रुपांतर झालं. बुधवारी म्हणजे 26 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास उत्तर ओडिशाच्या किनार्यावरील धामरा आणि बालासोर यांच्यामध्ये या चक्रीवादळाचा लँडफॉल झाला. यावेळी किनारी भागात तब्बल 120 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहात होते. ओडिशासोबतच पश्चिम बंगालच्या किनारी भागातल्या इस्ट मिदनापूर आणि साऊथ 24 परगणा या भागांना देखील वादळाचा तडाखा बसला. मात्र, तोपर्यंत चक्रीवादळाचा वेग ताशी 90 किलोमीटर इतका कमी झाला होता.
यास चक्रीवादळानं त्याची लँडफॉलची प्रक्रिया दुपारी अडीचच्या सुमारास पूर्ण केली आहे. मात्र, या भागामध्ये गुरुवारी दुपारपर्यंत पाऊस राहणार आहे. 27 मे रोजी सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. कारण समुद्र या काळात खवळलेला असेल.
उमाशंकर दास, ज्येष्ठ वैज्ञानिक