आ. जयंत पाटील यांच्या माध्यमातून 4 कोटींच्या कामाला मंजुरी


। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून तब्बल 4 कोटी 10 लाख रुपये निधीच्या पायाभुत विकास सुविधांकरिता मंजूरी मिळाली आहे. या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येणार असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केला जात आहे.


अलिबाग तालुक्यातील जि.प.विकास कामांची यादी पुढीलप्रमाणे, आंबेपूर येथील बांधण येथे गटार बांधकाम करण्यासाठी 15 लाख, शहापूर येथील धेरंड स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, शहापूर येथील धेरंड स्मशानभूमी सुशोभिकरण करण्यासाठी 10 लाख, पोयनाड येथील गावअंतर्गत रस्ते करण्यासाठी 15 लाख, पोयनाड देखील भाकरवड येथे अंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी 10 लाख, चिंचोटी मौजे दिवीपारंगी येथील देवीचोरी पासून स्मशानभूमीपर्यंत संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, वावेपोटगे येथील गावअंतर्गत रस्ते तयार करण्यासाठी 5 लाख, वेश्‍वी येथील सिध्देवर नदीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, वाडगाव फाटा येथे विसर्जन घाट बांधण्यासाठी 10 लाख, वेश्‍वी येथे गावअंतर्गत रस्ते रायार करण्यासाठी 15 लाख, गटार दुरुस्तीकरणासाठी 10 लाख, नदीला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 25 लाख, दत्ताराम म्हात्रे ते रोशन पाटील मेढेखार यांच्या घरापर्यंत रस्ता करण्यासाठी 10 लाख, मुख्य रस्ता ते बोडनवाडी आदिवासी वाडीपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणासाठी 10 लाख, संरक्षक भिंत बांधण्यासाठी 15 लाख, बोरघर येथील श्रीनगर स्मशानभूमीला संरक्षक भिंत बाधून सुशोभिकरणासाठी 10 लाख, बोरघर येथील खुमटे आदिवासी वाडी येथे रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, बोरघर वाडा ते बायजूवाडी येथील रस्त्याला खडीकरणासाठी 10 लाख, भिलजी येथे स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्याला सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी 10 लाख, हाशिवरे वैजाळी येथील बारक्या शेठ ते परमानंद साळुंखे यांच्या पर्यंत सिमेंट काँक्रिंटीकरणासाठी 5 लाख, वैजाळी येथील भालचंद्र ठाकूर ते पुनम ठाकूर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण 5 लाख, वैजाळी येथील तलावाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, शहाबाज येथील नवीन कमलपाडा येथील रोडलगत गटार तयार करण्यासाठी 5 लाख, सुडकोली येथील गावअंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी 12 लाख, सुडकोली येथील शंकर पाटील यांचे घर ते गणपती मंदीरपर्यत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता तयार करण्यासाठी 13 लाख, रामराज येथील नांगरवाडी नाल्यालगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी 15 लाख, बोरघर येथील बौद्धवाडी उमटे नाल्यालगत संरक्षण भिंत बांधण्यासाठी 15 लाख, पोयनाड येथील पांडवादेवी येथे गटार तयार करण्यासाठी 20 लाख, बुधीरदेव मंदिराजवळ सभामंडप बांधण्यासाठी 20 लाख, अंतर्गत गटार तयार करण्यासाठी 15 लाख तर पोयनाड अंतर्गत रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी 14 लाख अशा एकूण 64 कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

त्यासाठी आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून 4 कोटी 10 लाख रुपंयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Exit mobile version