| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पर्यटन वाढीसाठी अलिबागला ब दर्जा मिळाला आहे यामुळे नक्कीच फायदा झाला आहे. परंतु पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करावी जेणेकरून अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास होईल त्यामुळे पर्यटनाला व छोट्या व्यवसायिकांना व्यवसायात चालना मिळेल. अशी अपेक्षाही आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. स्वच्छतेसाठी जो निधी आलेला आहे त्याचा विनियोगही केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली. निसर्ग चक्रीवादळात अलिबाग तालुक्याचे मोठे नुकसान झालेले आहे, असेही जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले.