इंटेरियरच्या बहाण्याने फसवणूक

रायगड

पनवेल,  वार्ताहर

 इंटेरियर डिझायझरचे काम करण्याच्या बहाण्याने घर मालकांकडून लाखो रुपये उकळून त्यांचे काम पूर्ण न करता फसवणुक करणार्या एका जोडप्याने खारघर मधील श्रीवास्तव दाम्पत्याची 4 लाख 50 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. भानुप्रताप सिंग आणि अलका सुरी असे या जोडप्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्यांच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. दरम्यान, सदर या जोडप्याने अशाच पध्दतीने सानपाडा येथे राहणार्या एका विवाहितेला तसेच इंटेरियर डिझायनर व्यवसायाशी निगडीत असलेल्या दुकानदार, कारागीरांची देखील फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार खारघर पोलिसांनी भानुप्रताप सिंग आणि अलका सुरी या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

Exit mobile version