उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री

‘प्रश्‍नम’चा 13 राज्यांमध्ये सर्वे
मुंबई | प्रतिनिधी |
कोरोना काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रश्‍नम या संस्थेने देशातील प्रमुख 13 राज्यांत सर्वेक्षण घेतले आहे. यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वांत लोकप्रिय ठरले आहेत. प्रश्‍नम या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला. यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली असल्याचे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 49 टक्के मतदारांनी नोंदवले आहे. एकूण 13 राज्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे.

दरम्यान सर्वेक्षणानुसार, उद्धव ठाकरे या यादीत अव्वल आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना 44 टक्के पसंती मिळाली आहे. तिसर्‍या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. राज्यातील सर्वेक्षण झालेल्या 40 टक्के मतदारांनी त्यांच्या कामगिरीला मान्यता दिली.

Exit mobile version