ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची भारताला मदत

मुंबई

| मुंबई | प्रतिनिधी |

देश-विदेशातील खेळाडू कोरोना विषाणूंविरूद्धच्या युद्धात सतत भारताला मदत करत आहेत.  ब्रेट ली आणि पॅट कमिन्स या खेळाडूंच्या देणगीनंतर आता ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूने भारताला मदतीचा हात दिला आहे. जेसन बेहरेनडॉर्फ असे या खेळाडूचे नाव आहे. कमिन्स प्रमाणेच बेरेनडॉर्फही युनिसेफ ऑस्ट्रेलियाच्या इंडिया कोविड -19 क्रायसिस अपीलला देणगी देणार आहे. परंतु तो किती रक्कम देणार आहे याची माहिती त्याने दिली नाही.  ट्विटमध्ये जेसन बेहरेनडॉर्फ म्हणाला की, मबहुतेक क्रिकेटर्सप्रमाणेच माझ्यासाठीही भारत नेहमीच खास स्थान आहे. हा एक सुंदर देश आहे आणि येथील लोक नेहमीच आपले स्वागत करतात आणि भारतात क्रिकेट खेळणे जगातील इतर कोणत्याही अनुभवापेक्षा वेगळे आहे. भारतात जे घडतंय ते खरोखर भयावह आणि वेदनादायक आहे.फ

Exit mobile version