खेड मध्ये कडकडीत बंद


खेड। प्रतिनिधी ।
खेड नगरपरिषद महसूल विभाग व आरोग्यविभाग यांचे साथीने खेड पोलिसांनी पहील्याच दिवशी अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण शहर पूर्ण बंद ठेवून केलेल्या अमलबजावणीमुळे तालुक्यातील वाढत्या कोरोनो रूग्ण संख्येला नक्कीच आळा बसेल म्हणून जनमानसांतुन पोलीस खात्याचे व प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.


पुढील दिवसांतही असेच नियोजन करून तालुक्याचे वाढत्या रूग्णसंख्येच्या संकटातून दूर करण्यासाठी अशीच महेनत घ्यावी अशी मागणी तालुक्यातील जनमाणसांतून होत आहे. खेड शहरामध्ये व तालुक्यातून येणारे नागरीकांचे सुरक्षीततेसाठी व कडक लॉकडावूनच्या अमजबजावणीसाठी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी तालुक्यात रायगड जिल्ह्याच्या बाजूस असलेल्या कशेडी या ठिकाणी तशेच खेड शहरामध्ये तींबबती नाका शिवाजी चौक महाड नाका भरणे नाका भोसते गाव असे ठिक ठिकाणी नाके लावून अनावश्यक फिरणारे नागरीकांना शहरात येणे जाणे पासून रोखण्याचे काम करीत असतानाच स्वतः पोलीस निरीक्षक सर्वच नाक्यांवर गस्त घालीत असून नगर परिषदेच्या मदतीने शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून संपूर्ण शहर बंद ठेवण्याचे उत्तम नियोजन केले आहे.

यामुळे तालुक्यात वाढती कोरोना रूग्ण संख्येस नक्कीच आळा बसेल व तालुक्यात वाढणारी कोरोनोची साखली तोडण्यास यांचे नियोजनाचा नक्की फायदा होईल अशी आशा सर्व सामान्य नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे. या नियोजनाला तालुक्यातील जनतेस व्यापार्‍यांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून असाच पुढे काही दिवस प्रतिसाद देवून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच रूग्णसंख्या रोखीला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सर्वसामान्य जनतेला तसेच व्यापार्‍यांना केले आहे.

Exit mobile version