| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर शासकीय रेस्ट हाऊस जवळ मोटरसायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली नगरपालिका हद्दीतील विहारी येथील राज चंद्रकांत पाटेकर (17) हा विद्यार्थी शिळफाटा येथून खोपोली गावात जात असताना शासकीय रेस्ट हाऊस जवळील दर्ग्यासमोर गतीवरोधकावर पुढे जाणाऱ्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन चंद्रकांत याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने दुर्दैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला, पुढे जाणाऱ्या कारला ओव्हरटेक करीत असताना, टेम्पोला जाऊन धडकला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली, ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. अलीकडे त्याने अकरावीचा पेपर दिला अशी चर्चा आहे. या अपघाताने पाटेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.