देवघर-सोंडे ग्रामपंचायत जागेचा गैरवापर

। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रुपग्रामपंचायत व तलाठी कार्यालय बांधण्यासाठी देण्यात आलेल्या जागेचा गैरवापर करून. शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप. ज्येष्ठ ग्रामस्थ परशुराम मोरे यांनी रविवारी दि 8 मे रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. यावेळी त्यांनी आपण जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे व चौकशी सुरू झाल्याचे देखील सांगितले. आणि दोषी आढळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.
खेड मधील ग्रुपग्रामपंचायत देवघर सोंडे कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय या मुळ उद्देशाकरीता ग्रामस्थांनी शासनाला विनामुल्य जमीन दिली होती. त्या जिमीनीवर ग्रामपंचायतीने इमारत बांधकाम केले होते. आर्थिक गैरव्यवहार करून बंद झालेल्या देवघर पंचक्रोशी दुग्ध उत्पादक सह संस्था मर्यादितचे संचालक हरिश्‍चंद्र चव्हाण, मनोहर शेलार, डॉ. भागवत व तत्कालीन ग्रामसेवक श्री पांचाळ यांनी कट कारस्थान रचून खोटी बनावट कागदपत्र तयार करून ग्रामस्थांनी शासनाला दिलेल्या 5 गुंठे जागेचे दिशाभूल करणारे बक्षिसपत्र तयार केले.
त्याचजमिनी पैकी 3 गुंठे जागेचे दुसरे बक्षिसपत्र करून जागा व त्यावरील ग्रामपंचायतने केलेली बांधकामे हडप करून स्वत: चा मालकी हक्क प्रस्थापित केला आहे, असा आरोप मोरे यांनी यावेळी केला. शासकिय निधी अनुदान म्हणून घेऊन या जागेला संरक्षण भिंत घातली असा आरोप मोरे यांनी केला. शासकिय निधी अनुदान म्हणून घेऊन या जागेला संरक्षण भिंत घालून या जागेतून मोरे यांच्या जागेकडे जाणार व बालवाडीच्या मैदान व शौचालयामध्ये जाणारा वहीवाटीचा रस्ता बंद करून मोरे यांना जाणे येण्यास प्रतिबंध केला आहे. याची सखोल चौकशी होवून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई होणे बाबत जिल्हाधिकारी व सर्व संबंधित यंत्रणाकडे लेखी तक्रार केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Exit mobile version