पंढरपूरसाठी भगीरथ भालकेंना उमेदवारी

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

पंढरपुरात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना झाल्यापासून ही विधानसभेसाठीची पहिली पोटनिवडणूक असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशातच भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार घोषित केले आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version