पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान


। पंढरपूर । प्रतिनिधी ।

राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट वाढत असताना, पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शनिवारी यासाठी मतदान होत आहे. दुर्दैवाने आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत असताना राजकीय साठमारीत सर्वच पक्षांना याचा विसर पडला आणि सर्व नियम डावलून झालेल्या प्रचारामुळे आता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, असे भयानक चित्र आज तयार झाले आहे. रोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने मतदारातही घाबरून गेले आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात काट्याची टक्कर होत आहे. कोरोनाच्या छायेत कसे मतदान होणार यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. 

पोटनिवडणुकीत गेले काही दिवस विजय आमचाच म्हणत अजित पवार आणि जयंत पाटील यांनी भल्या मोठ्या सभांचा दणका उठवला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नंतर विजय द्या  राज्यातली सत्ता बदलू असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठं मोठ्या सभा घेतल्याने आता कोरोनाचे पीक जोमदार रीतीने येऊ लागले आहे. वास्तविक देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असताना ही पोटनिवडणूक टाळायचा प्रयत्न होणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजी कोरोनाला पोषक अशा मोठा मोठ्या सभा झाल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आता वाढू लागली आहे. वास्तविक गेल्यावेळी भाजपकडून निवडणूक लढवले माजी आमदार सुधाकर परिचारक यांचेही कोरोनामुळे निधन झाले होते. मात्र, पोटनिवडणुकीत प्रचार अशा रीतीने झाला की यांना ही पोटनिवडणूक का होतीय आणि या निवडणुकीमुळे किती जणांचे या कोरोनामुळे बळी जाऊ शकतील याचा विचारही शिवलेला दिसत नाही.

Exit mobile version