| पंढरपूर | प्रतिनिधी |
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय पूजा केली. नांदेडच्या वालेगावकर दाम्पत्याचा मानाच्या वारकऱ्यांमध्ये सन्मान झाला; ते 20 वर्षांपासून वारी करत आहेत. मंदिर समितीने तुळशीची माळ घालून वालेगावकर दाम्पत्याचा सत्कार केला.
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पहाटे पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली. यावेळी नांदेडच्या हिमायतनगरमधील रामराव वालेगावकर आणि सुशिलाबाई वालेगावकर मानाचे वारकरी ठरले. मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. वालेगावकर दाम्पत्य हे मागील 20 वर्षांपासून वारी करत आहेत. शासकीय महापुजेच्या वेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील सपत्नीक उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच मंत्री भरत गोगावलेदेखील यावेळी उपस्थित होते. शासकीय महापुजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वारकरी हे शेतकरीच आहेत. शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे, त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. राज्य शासनाने 32 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. बळीराजावरील सर्व संकटे दूर कर हेच मागणे मागण्यासाठी पांडुरंग चरणी आलो असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.






