|अलिबाग | प्रतिनिधि |
अलिबाग इथं फिरायला आलेले दोघे मित्र समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची ही घटना शनीवरी (दि.१) संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ड्रोन आणि बॅटरीच्या सहाय्याने पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत. शशांक सिंग (१९) रा. उलवे ता. उरण आणि पलाश पखर (१९) रा. सानपाडा नवीमुंबई अशी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे आहेत. उरण नवी मुंबई परिसरातील चार मित्र अलिबागला फिरायला आले होते. संध्याकाळच्या सुमारास यातील एकजण पोहायला उतरला. तो बुडू लागल्याने दुसरा त्याला वाचवायला गेला. मात्र दोघेही बुडून बेपत्ता झाल्याची माहिती अलिबागचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ जीवरक्षकाना पाचारण करण्यात आले. रात्रीच्या अंधारात ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीने शोध सुरू करण्यात आला.






