। म्हसळा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील मेंदडीकोंड येथे एक वृद्ध दाम्पत्य संशयस्पद कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शनिवारी (दि.1) रात्री घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेव बाळ्या कांबळे (95) तर त्यांच्या पत्नी विठाबाई महादेव कांबळे (83) हे वृद्ध दाम्पत्य हे म्हसळा तालुक्यातील मेंदडीकोंड येथे राहत होते. मात्र, शनिवारी रात्री त्यांच्या घरातून कुजल्याचा वास येत असल्याने गावातील काही नागरिकांनी त्यांचा घर उघडल्यावर त्यांना धक्का बसला. महादेव कांबळे व त्यांच्यापत्नी विठाबाई कांबळे या घरातील पलंगावर मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या. म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांना या प्रकरणात हत्येचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेनसिक टीम, फिंगर प्रिंट एक्सपर्ट व डॉगस्कॉड टीम ला पाचरण करून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व म्हसळा पोलीस करीत आहेत.






