| पंढरपूर | प्रतिनिधी |
पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रभागा नदीत बुडून एका तरुण भाविकांचा मृत्यू झाला आहे. शुभम पावले (27) असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदीत बुडून शुभम पावलेचा या तरुण भाविकाचा मृत्यू झाला आहे. तो आपल्या मित्रांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आला होता. आज सकाळी तो पुंडलिक मंदिराशेजारील चंद्रभागा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला होता. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल चार तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाही ही घटना घडल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.