पंढरपूर शहरात लसीकरण केंद्रावर गोंधळ

। पंढरपूर । प्रतिनिधी ।

पंढरपूर शहरात दि6मे पासून लसीकरण केंद्र दोन ठिकाणी सुरू केले आहे, पण नियोजन नसल्याने व वशिलेबाजी अशा गैरप्रकारांमुळे गरजू व गरीब लोकांना लस मिळत नसून वशिलेबाजी करणार्‍या धनदांडग्याना विनासायास लस दिली जात आहे. लोक कोरोना मुळे भयभीत झाले असून अनेकजण लस घेण्यासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत, अनेक लोक परवडत नसताना लांबून रिक्षाने लसीकरण केंद्रावर येत आहेत, पण लगेच लस संपली असे सांगून या लोकांना परत पाठविले जाते आहे, आज सकाळी असा प्रकार येथील लोकमान्य विद्यालय केंद्रात घडला,केवळ अर्ध्या तासात लस संपली असे सांगण्यात आले, रांगेत300लोक उभे असताना त्यांना कोणतेही सबळ कारण न देता परत पाठविले, अगोदरच तीन दिवसांपासून लसीकरण बंद होते,आता कसेबसे सुरू झाले तर तिथेही वशिलेबाजी अनेक वृद्धांना या गडबडीत दुसरा डोस 45 दिवस उलटून गेल्यावरही मिळालेला नाही, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा असे सांगितले, ते करूनही काहीही मेसेज येत नाही, लाखाच्या वर लोकसंख्या असणार्‍या पंढरपूर शहरात केवळ दोनच लसीकरण केंद्र आहेत,तिथेही केवळ अडीचशे डोस उपलब्ध असतात टोकन पद्धतीचा वापर केला जात नाही, ही लस एवढी महत्वाची आहे की सरकारने घरोघरी जाऊन पोलिओ डोस प्रमाणे सर्वांना घ्यायला हवी, इथे लोक स्वतःहून येत असूनही लस मिळत नाही, याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version