आरोपीविरोधात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल
| नवीन पनवेल | वार्ताहर |
तेरा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपी सुफियान आदम कुरेशी (28, रा. पळस्पे फाटा, अमिना हाऊस, शिफा हॉस्पिटलच्या बाजूला) याच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील पीडित मुलगीला आरोपी सुफियान कुरेशी याने फिरण्यासाठी घेऊन जाऊन तू मला फार आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, मी तुला सोडणार नाही असे बोलून जवळीकता साधली आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. हा प्रकार कोन गाव, साबीर ऑटो गॅरेजच्या पाठीमागे नवीन बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर घडला. या प्रकरणाची माहिती पीडित तरुणीने तिच्या घरी दिल्यानंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात सुफियान कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.