| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर परिसरात भरधाव व निष्काळजीपणे ट्रेलर चालवत चारचाकी वाहनाला धडक दिल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कृष्णमूर्ती पोटीरस्वामी (45) यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार श्री मातोश्री ट्रान्सपोर्ट प्रा.लि. कंपनीच्या ट्रेलर वरील चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडब्ल्यूआर कंपनीसमोर, पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. ट्रेलर चालकाने सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवत फिर्यादीच्या ऑक्टोव्हर या वाहनाला धडक दिली. या धडकेत वाहनाचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. त्यानुसार संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित बिरादार हे करीत आहेत.





