मच्छीमारांच्या मदतीसाठी राज्यपालांना साकडे

| नवी मुंबई |

निसर्गासह तौत्के  वादळाने बाधित झालेल्या मच्छिमारांना आता जर अपेक्षित आर्थिक मदत केली नाहीतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य होईल. म्हणून शासनाला  योग्य आर्थिक मदत करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आ. रमेश पाटील यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी याना राजभवन  येथे भेटून निवेदन दिले.यावेळी आ.आशिष शेलार उपस्थित होते. 

कोकण किनारपट्टीवर आलेल्या तौक्ते वादळाने ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील हजारो मच्छिमार बांधवांचे सुमारे 250 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मागील वर्षी निसर्ग वादळात 2100 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यावेळी फक्त सहा जिल्ह्याला शासनाच्या वतीने 65 कोटी रुपये इतकी तोकडी मदत दिली होती.त्यामुळे बर्‍याच मच्छीमाराना मदत पोहचली नाही.विशेष म्हणजे स्थळ पंचनामा करून देखील मदत पोहचली नसल्याने त्यांच्यात आजही नैराश्य असल्याचे राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शासनाकडे प्रलंबित असलेला डीझेल परतावा तात्काळ मिळावा,मृत्यू पावलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबांना व बोट नष्ट झालेल्या धारकांस प्रत्येकी पाच लाख रुपये,घरांचे नुकसान झालेल्या व्यक्तींना 25 हजार व बोटीचे थोडेफार नुकसान झालेल्या बोट मालकांना 50 हजार रुपये देण्यात यावेत.

 रमेश पाटील, आमदार

Exit mobile version